शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून दिनेश गावडे यांच्याकडून शेतकऱ्यांना युरिया खत वाटप…

⚡सावंतवाडी ता.२१-: चौकुळ येथील शिंदे शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक दिनेश गावडे यांच्या माध्यमातून चौकूळ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


श्री दिनेश गावडे हे सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकारणातही ते सक्रिय आहेत शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून चौकुळ पंचक्रोशीत ते कार्यरत आहेत त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात युवा वर्गाची फळी उभी आहे. देवसू येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारणात काम करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसाठी राबराब राबत असताना त्यांच्यासमोर असणारी संकटे लक्षात घेत श्री गावडे यांनी चौकुळ सह पंचक्रोशीतील गावांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात युरिया खताचे वाटप केले शेतीला आवश्यक असलेले खत मिळाल्याने शेतकरी वर्गातून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. त्यांच्यासोबत यावेळी विशाल बांदेकर सुनील नार्वेकर संतोष पडवळ व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
.जीवनात वाटचाल करत आपणही समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांनी हा उपक्रम राबवला येत्या काही दिवसातच पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांना पहा तसेच शैक्षणिक साहित्याचे ही वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. एकूणच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीला पंचक्रोचेतील जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

You cannot copy content of this page