श्री सरस्वती साईश्वरी संस्थेतर्फे गणेश पूजा साहित्य वाटप…

⚡मालवण ता.१०-: गणेश चतुर्थी सणानिमित्त श्री सरस्वती साईश्वरी संस्थे तर्फे देवगड तालुक्यातील गिर्ये बांदेवाडी येथे घरोघरी ग्रामस्थांना गणेश पूजा साहित्याचे वाटप करण्यात आले. या मदतीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संस्थेचे आभार मानले. यावेळी संस्थापक सुरज बांदकर, प्रज्ञेश बांदकर, चित्तरंजन बांदकर, कियारा बांदकर आदी उपस्थित होते.

Read More

युवतीसेनेतर्फे गौराई माझी लाडाची ग… स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.१०-:ठाकरे शिवसेनेच्या युवती सेना सिंधुदुर्गच्यावतीने गौराई माझी लाडाची गं.. या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती युवतीसेना जिल्हाप्रमुख सौ. नीनाक्षी शिंदे- मेतर यांनी दिली. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरी प्रतिष्ठापना केलेल्या गणपती व गौरी यांच्या सजावटीचा एक सेल्फी व एक व्हिडीओ काढून ९४२१९७११५९ या व्हॉटसअॅप नंबरवर आपले पूर्ण नाव व पत्ता…

Read More

शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे याच्या पोलीस कोठडीत वाढ…

तर बांधकाम सल्लागार डॉ. पाटील याला न्यायालयीन कोठडी.. ⚡मालवण ता.१०-: मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने आज दुपारी पुन्हा मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये जयदीप आपटे याला दि. १३ सप्टेंबर…

Read More

शंभूराजांच्या अग्र पूजेचा मान मिळविणे सोपी गोष्ट नाही…

अँड.शिवाजी देसाई यांच्याबाबत जयानंद सावंत भोसले यांचा गौरोद्गार:सांगली खळणेवाडी येथे देसाई यांचा झाला सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.१०-: एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन शंभूराजांच्या समाधीच्या अग्र पूजेचा मान मिळवणे त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सामाजिक कर्तुत्वाच्या जोरावर असंख्य पुरस्कार मिळवणे ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्रातील खळणेवाडी या दुर्गम गावातील भाचे तसेच गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुपुत्र अँड…

Read More

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱे ३ फरार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

तिघांना चार दिवसाची पोलीस कोठडी: तर ८ संशयित अद्याप फरार.. ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील अक्षय साईल या युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ११ फरार संशयितांपैकी तिघांना सावंतवाडी पोलिसांनी काल अटक केली. अजित बाळकृष्ण मठकर , संकेत रत्नाकर माळी ( रा . सावंतवाडी ) आणि श्यामू उर्फ शरद राजन साळगावकर रा . माजगाव , सावंतवाडी…

Read More

कुडाळ तालुक्यातील ५४ भजनी मंडळांना साहित्य वाटप…

जिल्हा परिषद स्वनिधीतून करण्यात आले वाटप:तालुक्यातून आले होते ३०० प्रस्ताव.. ⚡कुडाळ ता.१०-: कुडाळ तालुक्यातील ५४ भजन मंडळांना जिल्हा परिषद स्वनिधी योजनेतून आज भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. कुडाळ पंचायत समिती सभागृहात गट विकास अधिकारी धनंजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने भजनी कलाकार उपस्थित होते. ग्रामीण भागातील भजनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी…

Read More

गणेश भक्तांसाठी आणखी एक रेल्वे…!

कणकवली : गणेशभक्त, चाकरमानी प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे सातत्याने विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यात आता मडगाव- पनवेल-मडगाव या एक दिवसीय गाडीची भर पडली आहे. या गाडीच्या ‘अप-डाऊन’ या दोन्ही फेऱ्या १५ सप्टेंबला सुटणार आहेत. मडगाव-पनवेल (०१४२८) सकाळी ९.३० वा. मडगाव येथून सुटेल व रात्री १०.१५ वा. पनवेल येथे पोहोचेल. पनवेल-मडगाव (०१४२७)…

Read More

विजय‌ जोशी यांना राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.०९-:मसुरे गावचे सुपुत्र विजय‌ जोशी उर्फ विजो यांच्या ‘टोपीवाले फुगे’ या बालकविता संग्रहाला ‘कवितेचे घर’ चंद्रपूर पुरस्कृत बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या महाराष्ट्राच्या काव्य प्रांतात अतिशय चर्चेचा विषय असलेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात नवनव्या व वैशिष्ट्यपूर्ण अशा उपक्रमांची भर पडत आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव (बु.), त. वरोरा जि. चंद्रपूर येथील कवितेच्या…

Read More

सावंतवाडीत पर्यावरणास अनुकूल गणेश चतुर्थी कला स्पर्धेच ‘ॲन्ट्रीको’चं आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०९-: कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘ॲन्ट्रीको’ या संस्थेकडून ”पर्यावरणास अनुकूल गणेश चतुर्थी कला स्पर्धा” या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. निसर्गातील टाकाऊ घटकांपासून बनवलेली कलाकृती हा या स्पर्धेचा विषय आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही स्पर्धा आहे. यातील कलाकृतींचं प्रदर्शन सार्वजनिक गणेश मंडळ हॉल, सालईवाडा येथे २२ सप्टेंबर रोजी भरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे मिडिया…

Read More
You cannot copy content of this page