Headlines

मालवणच्या भंडारी हायस्कुलमधीलमल्टी स्कील फाउंडेशन कोर्स विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम

उद्योजकता विकास केंद्राचे माजी उपसंचालक सुनील देसाई यांचे प्रतिपादन

मालवण दि प्रतिनिधी

आजचे जग झपाट्याने बदलत आहे, उद्याची नोकरी आज अस्तित्वात नसेल, त्यामुळे एकाच शिक्षणाबरोबर अनेक कौशल्ये (Multi skills) शिकणे ही काळाची गरज आहे, लहानपणी कुटूंबातील संस्कार आणि आजूबाजूचे वातावरण यातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय जे गुण आहेत त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. उद्योजक हा जन्मावा‌ लागत नाही तो घडवता येतो या सिद्धांतानुसार मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूल मालवण यांनी आगामी काळाची पावले ओळखून २००७ सालपासून मल्टी स्कील फाउंडेशन कोर्स विद्यार्थ्यांसाठी सन २००७ पासून सुरु करून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे माजी उपसंचालक सुनील देसाई यांनी येथे बोलताना केले

मालवण येथील भंडारी ए सो हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री देसाई हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. आर डी बनसोडे , समन्वयक श्री. संदीप अवसरे, निदेशक श्री. केशव भोगले, श्री. जगन्नाथ आंगणे व सौ नेहा गवंडी आदी उपस्थित होते

प्रारंभी मुख्याध्यापक श्री. बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर निदेशक श्री. केशव भोगले यांनी प्रास्ताविक केले यावेळी नेहा गंवडे यांनी या आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे महत्त्व विषद केले

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भरविलेल्या खाद्य पदार्थाच्या तसेच विविध उपकरणे , पोस्टर, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू या प्रदर्शनाचे उदघाटनही श्री देसाई यांच्या हस्ते झाले यावेळी या उपक्रमाचे कौतुक करुन श्री देसाई यांनी यातील सहभागी विद्यार्थी विद्यार्थिना शुभेच्छा दिल्या

यावेळी बोलताना श्री देसाई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात‌ उद्योजकांना भविष्य कालीन संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. पर्यटन जिल्हा असल्याने होम सायन्स मधील कॅटरींग‌असेल, इलेक्ट्रिकीशियन असेल‌ किंवा इतर मल्टी स्कील कोर्ससे आहेत त्यातून स्थानिक विद्यार्थी स्वत: चे उद्योजकतेचे विश्व‌ निर्माण करुन नोकरी मागणारा न होता अनेकांना रोजगार देणारा होवू शकतो. शिवाय अर्थाजन निर्माण करण्याची ताकद या मल्टी स्कील फाउंडेशन कोर्समध्ये असल्याचे ते म्हणाले यावेळी सुनील देसाई यांचा मुख्याध्यापक श्री आर डी बनसोडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगन्नाथ आंगणे यांनी केले.
शेवटी कु. अनन्या अवसरे हिने या आभार मानले

You cannot copy content of this page