मालवण (प्रतिनिधी)
देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग शाखा मालवण आयोजित मालवण तालुक्यातील देवळी समाजातील विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा रविवार दि. २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण वायरी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे होणार आहे.
यावेळी पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण, दहावी, बारावी पंधरावी उत्तीर्ण व इतर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच समाजातील पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, यांचाही सत्कार करण्यात येणार आहे, याबाबत मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे झाली. यावेळी विष्णू चौकेकर, मधुसुदन परुळेकर, वसंत वराडकर, अनिल तोंडवळकर आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी देवळी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष राजन नाईक, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, व जिल्हा कार्यकारिणीचे इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी मालवण तालुक्यातील सर्व देवळी समाज बांधवांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी विष्णू चौकेकर (९४०३५९५३०५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी केले आहे.
