Headlines

कर्ले महाविद्यालयात करिअर संसदेचा शपथविधी सोहळा थाटात संपन्न…

मुख्यमंत्रीपदी सिद्धी सावळे तर कौशल्य विकास मंत्री म्हणून श्रध्दा जावकर..

⚡देवगड ता.१६-: तालुक्यातील शिरगाव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाच्या करिअर संसदेची १५ जुलै रोजी स्थापना करण्यात आली असून करिअर संसदेच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धी सावळे तर कौशल्य विकास मंत्री म्हणून श्रद्धा जावकर यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत १५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त राज्यातील महाविद्यालयांमध्ये करिअर संसदेची स्थापना करण्यात आली.
करिअर संसदेतील ११ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांनी शपथ दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य समीर तारी यांनी करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये समजावून सांगताना करिअर संसदेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी उत्तम संघटन कौशल्य आत्मसात करून लोकशाही मूल्यांची जपणूक करावी. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील महाविद्यालय घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त त्यांनी केले. यावेळी करिअर कट्टाच्या नामफलकाचे अनावरण शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास कार्याध्यक्ष अँड. पी. व्ही. साटम, सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, उपाध्यक्ष विजय जाधव, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधिक्षक सुधीर साटम, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अँड. मालोजीराव साटम, हेमंत देसाई, संस्थेचे पदाधिकारी व संचालक , करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर, करिअर कट्टा सहाय्यक प्राध्यापिका कोमल पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच करीअर संसदचे नवनियुक्त पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी स्थापना करण्यात आलेल्या करिअर संसदेच्या मुखमंत्रीपदी सिद्धी सावळे, नियोजन मंत्री दिक्षिता खाडये, कायदे व शिस्तपालन मंत्री कशिश घाडी, सामान्य प्रशासन मंत्री मानसी भोगले, माहिती व प्रसारण मंत्री तनुजा साळसकर, उद्योजकता विकास मंत्री विराज लाड, रोजगार व स्वंयरोजगार मंत्री सानिका गोठणकर, कौशल्य विकास मंत्री श्रध्दा जावकर, संसदीय कामकाज मंत्री कार्तिक यादव, महिला व बालकल्याण मंत्री मयूरी मल्हार तर सदस्य म्हणून आदित्य सावंत यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना करिअर कट्टा दैनदिनी आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page