⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे सावंतवाडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवार दि. 20/7/2026 रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर असून प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण(समीर) परीट फॉरेस्ट ऑफिसर, सौ दिपाली दिलीप भालेकर महिला बालकल्याण सभापती सावंतवाडी नगरपरिषद व सौ सुनीता होडावडेकर महिला बालकल्याण उपसभापती सावंतवाडी नगरपरिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी परीट समाजातील सर्व समाज बांधव भगिनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे व ज्या दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांना आपली नावे द्यायची असतील त्यांनी शहराध्यक्ष दयानंद रेडकर (मो.नं. 7620676644) यांच्या जवळ द्यायची आहेत असे आवाहन परीट समाजाचे तालुका अध्यक्ष राजू भालेकर, तालुका सेक्रेटरी लक्ष्मण बांदेकर, तालुका खजिनदार जितेंद्र मोरजकर व महिला तालुकाध्यक्ष सौ देवयानी मडवळ यांनी केले आहे.
