मंत्री केसकरांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा घालणार…

राजन तेली: केसरकरांना बजावली कायदेशीर नोटीस…

⚡सावंतवाडी ता.११-: कणकवलीत घडलेल्या भिसे हत्याकांड प्रकरणात राजन तेली जेल मध्ये होते. असे वक्तव्य करून आमदार दीपक केसरकर आपली नाहक बदनामी करत असून, या प्रकरणात आपली न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली असताना देखील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी दीपक केसरकर अशी वक्तव्य करत आहेत. त्यांनी आपली जाहीररीत्या माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नेते राजन तेली यांनी आपल्या वकिलामार्फत दीपक केसरकर यांना नोटीस पाठवून केली आहे. येत्या दोन दिवसांत जाहीररीत्या वृत्तपत्रातून माफीनामा जाहीर न केल्यास 1 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

तसेच सबंधित नोटीस पाठविण्यासाठी आलेल्या नोटीसीचा खर्च आणि वकिलाची फी अशी एकूण 25 हजार रुपयांची मागणी केली आहे. ही नोटीस राजन तेली यांच्यामार्फत अँड. भरत नरहरी प्रभू यांनी पाठवली आहे.

You cannot copy content of this page