कोकणची जनता मी माझे कुटुंब मानतो…

खा. नारायण राणे:गतिमान विकासातून जिल्ह्याचा कायापालट करणार…

मालवण दि प्रतिनिधी :
कोकणची जनता मी माझे कुटुंब मानतो. प्रत्येक गावाशी माझे आपुलकीचे नाते आहे. येथील जनतेचा सर्वांगीण विकास हेच माझे लक्ष आहे. जिल्ह्यात विकासाची क्रांती घडवायची आहे. खासदार निधी बरोबरच केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी आणणारच. सोबत मोठया मताधिक्याने विजयी होणारे आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर या सर्वांच्या एकत्रित सहभागातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकासातून कायापालट करणार. असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने खा. नारायण राणे यांनी वराड, काळसे गावांना सदिच्छा भेट दिली.

खा. नारायण राणे यांनी वराड गावात भेट देत श्री देव वेताळ देवालयात दर्शन घेतले. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी राजन माणगांवकर, जिल्हापरिषद प्रभारी सतीश वाईरकर, बबन पांचाळ, महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, अशोक परब, भाई परब, ऍड. प्रदीप मिठबावकर, बुथ कमिटी अध्यक्ष हनुमंत सरमळकर, अजय चव्हाण, बाळा मसुरकर यांसह अन्य पदाधिकारी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. तर काळसे येथे माजी सभापती राजेंद्र परब, सरपंच विशाखा काळसेकर, नंदू नातू, अमृत नार्वेकर, विपुल मळगावकर, शामसुंदर प्रभू, कमलाकांत आजगावकर, सुमन गोसावी, सिद्धेश माळगांवकर, सतीश वाईरकर, आशिष हडकर, भाजपा महिला पदाधिकारी पुजा वेरलकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, भाई मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page