कणकवली/ वार्ताहर
शिक्षणाच्या विविध प्रश्नांसाठी लडाखचे पर्यावरणीय कार्यकर्ते व संशोधक सोनम वांगचुक यांनी दिल्लीत सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी कणकवलीत सांकेतिक उपवास करण्यात आला. वांगचूक यांच्या आंदोलनाला नैतिक बळ देण्यासाठी आणि आगामी २० जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या संसद मोर्चाला समर्थन देण्यासाठी ‘आम्ही भारतीय’ यांच्या वतीने कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, नितीन वाळके, विलास कोरगावकर विलास गुडेकर, बाळू मेस्त्री, नामानंद मोडक, राहुल कदम, राहुल कांबळे, मेगल डिसोजा, फिजा मकानदार आदी युवक युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
