दिलीप नार्वेकर:केसरकर यांनी गेली पंधरा वर्षे मतदार संघाची वाट लावली..
⚡सावंतवाडी ता.११-:
येथील मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी विकासासाठी कोणतेही काम केले नाही. या निष्क्रिय आमदाराला पुन्हा पुन्हा निवडून देऊन आपण मोठी चूक केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदारांच्या यादीत आपला हक्काचा आमदार विधानसभेत पाठवूया असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर यांनी सावंतवाडीतील गाव भेट दौऱ्यानिमित्त केले.
यावेळी शहरात उभ्या बाजारात काशिनाथ दुभाषी यांच्या घरी, आत्मेश्वर मंदिरच्या बाजूला,भट्टी वाडा,जिमखाना येथील लाखे वस्ती,भटवाडी आधी परिसरात बैठका घेण्यात आल्या. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ तालुकाप्रमुख मायकल डिसोजा शैलेश गवंडळकर, महेंद्र सांगेलकर काशिनाथ दुभाषी उमेश कोरगावकर श्रुतिका दळवी सायली दुभाषी आशिष सुभेदार निशांत तोरस्कर यांच्यासह नाना मसुरकर बाळ चोडणकर आदी उपस्थित होते.
श्री नार्वेकर पुढे म्हणाले केसरकर यांनी गेली पंधरा वर्षे मतदार संघाची वाट लावली आहे. केसरकर याना तीन टर्म आमदार म्हणून निवडून देऊन आपण सर्वानी मोठी चूक केली आहे.हा मतदारसंघ विकास कामापासून 20 वर्षे मागे आहे. तेली हे ग्राउंड लेव्हल ला काम करणारे उमेदवार आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून महाविकास आघाडीचा आमदार विधानसभेत पाठवूया या ठिकाणी या मतदारसंघात काम करणारा आमदार आपल्याला हवा आहे घोषणा करून मुंबईला जाऊन राहणारे आमदार नकोत त्यामुळे या वेळेला तुम्ही तेली यांना संधी द्या येत्या सहा महिन्यात तुम्हाला विकास झालेला दिसेल अशी मी ग्वाही असेही त्यांनी सांगितले
