मालवण दि प्रतिनिधी
आचरा पिरावाडीची सुकन्या
तेजश्री सूर्यकांत चोपडेकर हिची अभिलेखपाल (सिव्हिल इंजिनिअर ) या पदावर उपसंचालक कार्यालय, भूमि अभिलेख – कोकण प्रदेश,मुंबई महसूल विभाग – महाराष्ट्र शासन या पदावर निवड झाली आहे. पिरावाडी आणि आचऱे गावासाठी अभिमानाची बाब असल्याने तीचे अभिनंदन होत आहे.
तेजश्रीचे प्राथमिक शिक्षण हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण रामेश्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडीत झाले.
तीच्या यशाबद्दल पिरावाडी ग्रामस्थ मंडळाकडून अभिनंदन केले जात आहे.
