ओवळीये बौद्धवाडीतील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल..
⚡मालवण ता.११-:
मालवणचे आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील ओवळीये-बौद्धवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.ओवळीये गावचा विकास हा आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून विविध योजनांमधून त्यांनी लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते ओवळीये गावातील विकासकामांना प्राधान्य देतील,असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत ओवळीये गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही,असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा गावशाखा अध्यक्ष पायल जंगम, उपाध्यक्ष धर्मेंद्र जंगम, बाबा आंगणे, विभागप्रमुख बंड्या चव्हाण, प्रदीप परब, संजय पडवळ, अंबाजी सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.
