दोडामार्ग मध्ये शिवसेना शिवदूत मेळाव्यात पदाधिकाऱ्यांकडून आवाहन..
⚡दोडामार्ग ता.११-: मंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून भरघोस मतधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शिवदूतांनी “डोअर टू डोअर” प्रचार करावा असे यावेळी शिवदुताना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवदूतांचा मोठा प्रतिसाद लाभला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांसह आपा गवस, गवस, अनिल शेटकर, संजय गवस, दयानंद धाऊसकर, तुकाराम बर्डे, सान्वी गवस, दादा पालेकर, रामदास मेस्त्री, भगवान गवस, दादा देसाई, लाडू आयनोडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
