बांद्यात नट वाचनालयच्या वतीने बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन…!

⚡बांदा ता.१९-: येथील नट वाचनालयच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विष्णु नारायण गांवकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी “कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. बिपीन विष्णु गांवकर स्मरणार्थ”) बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे. ही…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक सुयोग पंडित यांच्या ‘सुक्या सुंगटाची कढी’ कादंबरीचा वाचकार्पण सोहळा संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे पहिली संपूर्ण मालवणी कादंबरी सुक्या सुंगटाची कढी ह्या पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा १४ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. मालवणचे लेखक सुयोग पंडित यांची ही पहिली कादंबरी असून उद्योजक व साहित्यिक रुजारीओ पिंटो आणि माजी नगरसेवक व उद्योजक नितीन वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला….

Read More

सावंतवाडी भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर …

सावंतवाडी : शहर भाजपची कार्यकारीणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी जाहीर केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर मंडळाली कार्यकारिणी गठीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदी अजय गोंदावळे यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आल्याची माहिती संजू परब यांनी दिली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस महेश सारंग यांच्या शिफारशीनुसार ही तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात…

Read More

युवा रक्तदाता संघटनेमुळे वाचले रूग्णाचे प्राण…

सावंतवाडी : येथील राजन गावडे रुग्णाला गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये ऑपरेशन दरम्यान ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या ५ फ्रेश रक्तपिशवींची आवश्यकता होती. याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अथर्व सावंत, संदेश नेवगी, नाविद हेरेकर, वसंत सावंत, सुमीत मुळीक या दात्यांनी सावंतवाडीतून गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये जाऊन रक्तदान केले. गेली ८ वर्षे गोवा बांबोळी व कोल्हापूर येथे ह्रदयशस्त्रक्रीयेसाठी तातडीने लागणारे रक्तदाते…

Read More

सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला आमदार वैभव नाईक यांचा पाठींबा…

महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे राज्याच्या महसूल सचिवांचे लक्ष वेधणार.. कुडाळ : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे गुजराती परप्रांतीय एका कंपनीने तेथील काही ग्रामस्थांच्या सामाईक जमिनी सरकारी यंत्रणांना हाताशी धरून जमीन घेतले आहेत. त्याविरोधात ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आवाज उठवीत २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे नाव प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवा…

बबन साळगावकर:ज्या रुग्णालयात उपचार मिळू शकत नाही अशी रुग्णालय हवीत तरी कशाला..? ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात किती वर्षे रुग्णांची हेळसांड चालणार असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला. तर उपजिल्हा रुग्णालयाचे नाव‌ बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवा असा खोचक टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले, सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये एका महिला रुग्णास सर्पदंश झाला….

Read More

बांदा पोलीस स्थानकात २५ रोजी जंगी डबलबारी भजन सामन्याचे आयोजन…

⚡बांदा ता.१९-: येथील पोलीस स्थानकात एकवीस दिवसीय गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जंगी डबलबारी भजन सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

इन्सुलीत २९ रोजी जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…!

⚡बांदा ता.१९-: सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित माजी शिक्षण व आरोग्य सभापती तसेच माध्यमिक अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २९ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धकांची भोजनाची व्यवस्था करण्यात…

Read More

आरोस येथे शिवसेनेच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१९-: सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन अभियानांतर्गत मार्गदर्शन आयोजित केले, याचा शुभारंभ आज सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावातुन करण्यात आला.. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” कुटुंब भेट अभियान अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावात शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे, संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर, संजय पांगम, उपसंघटक संजय…

Read More

आपण समाज सेवा करत राहायचं; विधानसभेवर बोलणं एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही…

विशाल परब: मतदार संघात तरुणांचा असलेला बेरोजगारीचा प्रश्न येणाऱ्या काळात मी सोडवणार.. ⚡सावंतवाडी ता.१९-: आपण समाजसेवा करत राहायचं जे काय ठरवायचा आहे ते वरिष्ठ ठरवतील मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, विधानसभेवर बोलणे एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही,अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. दरम्यान या मतदारसंघात…

Read More
You cannot copy content of this page