पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले महेश सारंग यांच्या गणरायाचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०६-: पालकमंत्री नितेश राणे यांनी आज भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या कोलगाव येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे घेतले दर्शन. यावेळी सारंग कुटुंबियांनी पालकमंत्री राणी यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राणे यांनी देखील कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Read More

राजू देसाई व देविदास प्रभुगांवकर यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.०५-:सावंतवाडी येथील दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे शिक्षक दिनानिमित्त गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये मालवण तालुक्यातील दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल, मालवण चे शिक्षक श्री. राजू भाऊसाहेब देसाई व मालवण रेवतळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. देविदास प्रभुगांवकर यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप…

Read More

व्हायरल व्हिडीओतून हायस्पीड नौकांचे अतिक्रमण आले समोर…

⚡मालवण ता.०५-:जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड मासेमारी नौकांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत पारंपारिक मच्छिमारांकडून सातत्याने आवाज उठविला जात असताना या हायस्पीड नौकांची समुद्रातील दादागिरी दर्शविणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुमारे सात ते आठ हायस्पीड नौका दिसत असून पारंपारिक मच्छिमारानी समुद्रात टाकलेल्या जाळीवरून हायस्पीड नौका नेऊ नये अशी विनंती पारंपारिक मच्छिमार…

Read More

चोरटी वाळू वाहतूक करणारा डंपर कणकवली पोलिसांनी पकडला…

५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त.. कणकवली : विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर ( एमएच ०७ – एजे ६७५७) कणकवली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजेंद्र नानचे यांनी ४ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता लक्ष्मी चित्रमंदिर नजीक पकडला. ४ सप्टेंबर रोजी आचरा कणकवली रस्त्यावर कणकवली च्या दिशेने सदर डंपर वाळू वाहतूक करत होता. एपीआय नानचे यांनी डंपर…

Read More

श्रावण येथे लोकवस्तीच्या ठिकाणी बिबट्याचा संचार…

⚡मालवण ता.०५-:मालवण तालुक्यातील श्रावण येथे आज पहाटे ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास श्रावण येथील लोकवस्तीच्या ठिकाणी रस्त्यावर संचार करताना हा बिबट्या दिसून आल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मालवण तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्यांचा संचार सुरु असताना श्रावण गावातही बिबट्याचा संचार सुरु असल्याचे समोर आले आहे. श्रावण येथील…

Read More

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ : सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन अंतर्गत गुरुवारी ०४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फ्रेण्ड्स ग्रुप, दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे तीन महिलानी रक्तदान केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. याच काळात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर…

Read More

पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.०५-:राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.

Read More

बांदा शहरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी…!

⚡बांदा ता.०५-: पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त बांदा शहरात ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील मुस्लिम बांधवांनी भव्य रॅली काढली.सकाळपासूनच मशिदींमध्ये नमाज पठण करून विशेष दुआ करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅलीला सुरुवात झाली. हातात झेंडे, बॅनर व आकर्षक फलक घेऊन निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते….

Read More

अबिद नाईक यानी कणकवली शहरातील मानाच्या संतांच्या गणपतीचे घेतले दर्शन…!

⚡कणकवली ता.०५-: कणकवली शहरातील टेंबवाङी येथे मानाचा नवसाला पावणारा संतांचा गणपती बाप्पा यांचे दरवर्षीप्रमाणे दर्शन आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनीगणपती बाप्पाला फुलांचा हार अर्पण करून दर्शन घेतले त्यावेळी गार्‍हाणं घालताना सर्वांना सुखी, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना केली त्यावेळी संतांच्या गणपतीचे मानकरी सुनील सावंत यांनी अबिद नाईक यांचा गार्‍हाणं घालून यथोचित सन्मान…

Read More

सावंतवाडी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले विनायक राऊत यांच्या गणपतीचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या गणपतीचे आज सावंतवाडी मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेत दर्शन घेतले. यावेळी राऊत यांनी पदाधिकारी यांच्यासोबत आगामी स्थानिक निवडणुका संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राहू त्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यावेळी विधान सभा प्रमुख रुपेश राऊळ, सरपंच गुणाजी गावडे, सुनील…

Read More
You cannot copy content of this page