पालकमंत्री नितेश राणे:गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन..
⚡कणकवली ता.१३-: जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून साठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच गॅसचा पुरवठा नियमित होईल, असा विश्वासही पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सोशल मीडियावर फिरणाऱ्या विविध पोस्ट किंवा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन व शासन बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवून गॅसची साठेबाजी करू नये, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
