महिलांच्या कर्तृत्वाला सलाम…

सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते सावंतवाडीत कर्तृत्ववान महिलांचा गौरव..

सावंतवाडी : ”इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी” हे ब्रीद जपत सामाजिक कार्य करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, तुळस या संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ‘नारी अभ्युदय महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या हस्ते यावेळी कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.

स्त्रीशक्तीचा सन्मान आणि महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब उपस्थित होत्या. महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करताना महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहन सौ. परब यांनी केले. या महोत्सवात जिल्ह्यातील नव्याने निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद सदस्या प्रियांका संजय नाईक, सुपर्णा वसंत सांगोरकर, सुजाता अभिजित पडवळ, श्वेता सूर्यकांत धाणे, साक्षी गणेश तवडेकर, तसेच पंचायत समिती सदस्या अवनी अमित राऊळ, धनश्री मराठे, ऋतिका नाईक, सोनाली अंकुश नाईक-कुबल, साक्षी शैलेश नार्वेकर आणि प्रियांका घावड यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय नगरपालिका व नगरपंचायत महिला प्रतिनिधी दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, निलम नाईक, रिया वासुदेव केरकर, काजल किरण कुडाळे, लीना समीर म्हापणकर, नमिता रोहित रेडकर, गौरी पारकर, संजना मेहावणकर, क्रांती मधव आणि संध्या प्रसादी यांचाही सन्मान करण्यात आला.

तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विनिता विलास देसाई, मोहिनी मोहन रेडकर, स्मिता सुनिल गावडे, रूपा मृगेश मुद्राळे, नेहा नारायण परब, नुपूर अक्षय मडकर, मेघना प्रकाश राऊळ, सुजाता बाळकृष्ण गोसावी, भाग्यलक्ष्मी शिवप्रसाद घाटे, अनन्या सत्यवान तेंडोलकर आणि अमृता आशिष पाडगावकर या ११ महिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ तसेच महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सौभाग्य संध्या’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वेताळ प्रतिष्ठानच्या या उत्तम उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले. तर आभार वेताळ प्रतिष्ठान, तुळसच्या पदाधिकाऱ्यांनी मानले.

You cannot copy content of this page