दोडामार्ग : तालुक्यातील झरेबाबंर-आंबेली ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल दत्ताराम शेटकर यांची ‘महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नालंदा ऑर्गनायझेशन यांच्या वतीने ही निवड जाहीर करण्यात आली.
ग्रामविकास, सामाजिक कार्य आणि प्रशासनातील प्रभावी कामगिरीची दखल घेत आदर्श सरपंच म्हणून त्यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार सोहळा २५ एप्रिल २०२६ रोजी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
या निवडीबद्दल दोडामार्ग तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आदर्श कामगिरीबद्दल अनिल शेटकर यांना ‘महाराष्ट्र रत्न सन्मान २०२६’ जाहीर…
