छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिर उद्या साटेली-भेडशी येथे…

दोडामार्ग, दि-१३ : दोडामार्ग तहसील कार्यालयातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिर’ उद्या दि. १४ मार्च रोजी साटेली-भेडशी मंडळातील ओम गणेश मंडळ हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात फेरफार प्रकरणांचा निपटारा, डिजिटल ७/१२ व ८-अ उतारे, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रांचे वितरण, तसेच अकृषिक (NA) परवानगीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय पट्टेवाटप, ई-मोजणी अर्ज स्वीकृती, पीएम किसान व ॲग्रीस्टॅग नोंदणी, सामाजिक योजनांचे लाभ आदी कामे शिबिरस्थळी केली जाणार आहेत.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

You cannot copy content of this page