Headlines

शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या डागडुजीसाठी परशुराम उपरकर यांनी उठवला होता आवाज

आताचे आमदार केवळ मंदीर परिसरात फिरुन फोटोसेशन करत फुकाचे घेत आहेत फुकाचे श्रेय मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली टीका *💫मालवण दि.२१-:* जगातील एकमेव असलेले शिवाजी महाराजांचे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे.या मंदिराची डागडुजी करण्यासाठी तत्कालीन विधान परिषदेचे आमदार माननीय परशुराम उपरकर यांनी सन २००८ मध्ये डागडुजी करण्यासाठी आवाज उठवला होता या कामासाठी निधी मंजूर…

Read Full News

सावंतवाडी येथील बॉम्बे ट्रेडींग दुकानाचे मालक जयंत कुळकर्णी यांचे निधन

सावंतवाडी : सावंतवाडी-जिमखाना येथील रहिवासी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष तथा सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध बॉम्बे ट्रेडिंगचे मालक जयंत बाळकृष्ण कुळकर्णी (५६) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक होते. त्यांनी सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्ग…

Read Full News

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत फोंडाघाटची कु. अनुष्का मनिष गांधी जिल्ह्यात तिसरी….

*💫कणकवली दि.२१-:* माध्यमिक (इ.८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची विद्यार्थीनी कु. अनुष्का मनिष गांधी हिने राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त करून जिल्ह्यात तृतीय क्रमांक व तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला.तिचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. तिला न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि खानविलकर कोचिंग अकॅडमी चे खानविलकर सर…

Read Full News

शहरातील प्रक्रिया न करता येणाऱ्या कचऱ्याचे होणार बायोमायनिंग

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली माहिती *💫मालवण दि.२१-:* मालवण नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये असलेल्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करणे व व्यवस्थापन करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. २८ लाख ३४ हजार रुपये खर्चाच्या या कामामुळे शहरातील प्रक्रिया न करता येणाऱ्या कचऱ्याचे बायोमायनिंग म्हणजेच कचरा बारीक करून खत मिश्रित…

Read Full News

वेंगुर्ला तालुका खरेदी-विक्री संघातर्फे २३ रोजी भात खरेदीचा शुभारंभ….

*💫वेंगुर्ला दि.२०-:* वेंगुर्ला तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने शासकीय किमत भात खरेदी योजना २०२०-२१ अंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ सोमवार २३ नोव्हेंबर रोजी खरेदी विक्री संघाच्या कॅम्प येथील गोदामस्थळी होणार आहे. खरेदी-विक्री संघाच्या श्रीदेव रामेश्वर मंदिर नजिकच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुनच भात खरेदीसाठी केंद्रावर आणावे. त्यासाठी सातबारा मुळप्रत, बँक पासबुक, खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड, बँक खाते…

Read Full News

संत गाडगेबाबा मंडईजवळील स्टॉलवर पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी आल्याने बाजारपेठेत वादंग

स्थानिकांनी कारवाईला विरोध करत घेतला आक्रमक पवित्रा *💫सावंतवाडी दि.२०-:* संत गाडगेबाबा मंडईला लागून असलेल्या स्टॉलवर पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी आल्याने बाजारपेठेत वादंग निर्माण झाला. यावेळी स्थानिकांनी या कारवाईला विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला. गेली १५ वर्षे आपण रक्षाबंधन, दिवाळी आदी सणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची परवानगी घेऊन याठिकाणी स्टॉल उभारतो. दिवसाला शंभर रुपयांची पावती फाडून कायदेशीर रित्या व्यवसाय…

Read Full News

शिवराजेश्वर मंदिराच्या दुरूस्तीच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

*💫मालवण दि.२०-:* देशातील एकमेव असलेल्या मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराच्या दुरूस्तीचे व नूतनीकरणाचे काम सुरु असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मंदिरात भेट देत दर्शन घेतले तसेच सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करून घेण्याबरोबरच आवश्यक त्या सूचना आ. वैभव नाईक…

Read Full News

बोलेरो पिकअप मालवाहक वाहनाच्या चोरीचा पर्दाफाश

सिंधुदुर्ग पोलीस पथकाची कामगिरी *💫सिंधुदुर्गनगरी-:* सिंधुदुर्ग पोलीस पथकाने झाराप येथील गंगाराम रेडकर यांची चोरीस गेलेली बोलेरो पिकअप मालवाहक गाडी रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथून पोलिसांनी ताब्यात घेतली. १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत गंगाराम रेडकर,( ३६, रा. झाराप, ता. कुडाळ) यांच्या मालकीची बोलेरो पिकअप मालवाहक गाडी (एम एच-०७,पी-२६११) ही अज्ञात चोरट्याने बालाजी मार्बल, कुडाळ येथून चोरुन…

Read Full News

राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरण व कुळकरवाडी पायवाट कामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

*💫मालवण दि.२०-:* मालवण तालुक्यातील राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरण , व राठिवडे कुळकरवाडी पायवाट या कामांचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हानियोजनच्या जनसुविधा योजनेअंतर्गत राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरणासाठी ८ लाखाचा निधी तर आमदार स्थानिक विकास निधीतून राठिवडे कुळकरवाडी पायवाटेसाठी ३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी आ. वैभव…

Read Full News

सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक राजेद्र दाभडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी शहरात कारवाई मोहीम

५५ वाहन चालकांवर कारवाई : १८,८०० रुपयांचा दंड वसूल * सावंतवाडी : सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक राजेद्र दाभाडे अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटिल, जिल्हा वाहतूक शाखाचे पोलिस निरीक्षक श्री भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात कारवाई मोहिम राबवण्यात आली. यात आज दिवसभरात शहरात ५५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून १८,८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे….

Read Full News

You cannot copy content of this page