Headlines

मालवणच्या डम्पिंग ग्राउंडवर मृत कुत्र्याचा सडलेला मृतदेह…

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर:रेबीजग्रस्त बैल आणि कुत्र्याच्या मृतदेहांची योग्य विल्हेवाट न लावल्याचा आरोप;नगरपालिका प्रशासनाविरोधात लेखी तक्रार करणार..

⚡मालवण ता.२५-:
मालवण शहरातील डम्पिंग ग्राउंडवर रेबीजग्रस्त बैल आणि कुत्र्यांचे मृतदेह उघड्यावर टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार तीन दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर ठाकरे शिवसेनेने याबाबत व्हिडिओद्वारे लक्ष वेधल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेने केला असून पुन्हा पाहणीसाठी गेलेल्या ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर, महेंद्र म्हाडगूत पदाधिकारी बाबी जोगी, उमेश चव्हाण, किरण चव्हाण दीपा शिंदे यांना आणि स्थानिक नागरिकांना मृत कुत्र्याचा पूर्णपणे सडलेला मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे दुसऱ्या कुत्र्याकडून लचके तोडले जात असल्याचेही निदर्शनास आल्याने परिसरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मालवणवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असताना, संबंधित यंत्रणेकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्यासह नगरसेवक महेंद्र म्हाडगूत आणि ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे या प्रकरणी कोल्हापूर येथील प्रदूषण नियंत्रण विभागाकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचेही ठाकरे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे

मृत प्राण्यांच्या मृतदेहांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, परिसराची स्वच्छता राखणे आणि संभाव्य आरोग्य धोक्यांना प्रतिबंध करणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगून ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे

You cannot copy content of this page