मालवण (प्रतिनिधी)

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून मालवण वायरी येथील मारुती मंदिर परिसरात उभारणी करण्यात आलेल्या विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
वायरी परिसरातील कमी दाबाचा वीज पुरवठा व अन्य वीज समस्या सोडवण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका निना मुंबरकर यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला. येथे वीज ट्रान्सफॉर्मर उभारणी झाल्या बाबत तसेच दिलेला शब्द पुर्ण केल्या बद्दल नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. यापूर्वी सातेरी देवी मंदिर मार्ग येथेही विद्युत ट्रान्सफॉर्मरची उभारणी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्षा दिपक पाटकर, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका निना मुंबरकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर, नगरसेविका अश्विनी कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मच्छिमार आघाडी तालुकाप्रमुख, भाऊ मोरजे अवी सामंत, सूर्यकांत फणसेकर, संदेश चव्हाण,
श्रीकांत वेंगुर्लेकर, साई बांबूळकर, बंड्या गांवकर, पुजा खराडकर, सौ. बांबूळकर, गोविंद गांवकर, विरेष चव्हाण, योगेश गवंडी, विजय आडेकर, दिलीप नाईक, साईराज चव्हाण, साईल जाधव, बबलु गांवकर, तेजस लुडबे, नंदू देसाई, गणेश परब यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. सातत्याने विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी आभार व्यक्त केले.
