Headlines

शिवसेना उपजिल्हाप्रमुख काँग्रेसच्या वाटेवर ? अभय शिरसाठ यांच्याकडून दुजोरा

*💫कुडाळ दि.२३-:* कुडाळ येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत आहेत त्यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला असुन त्यांनी खुद्द याला दुजोरा दिला आहे. श्री. शिरसाट यांनी आज मंत्रालय येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू खासदार राजीव सातव तसेच माजी…

Read Full News

संत गाडगेबाबा मंडई येथील स्टाल हटावावरून पुन्हा वादंग व्यापाऱ्यांची नाराजी

*💫सावंतवाडी दि.२३-:* दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा मंडई येथे स्टॉल लावण्यास दिलेली परवानगी संपल्याने आज पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व स्टॉल हटविले. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा वादंग निर्माण झाला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा मंडई येथे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्टॉल लावण्यास व्यापाऱ्यांना परवानगी दिली होती. मात्र ही मुदत आज संपल्याने व्यापाऱ्यांनी आज स्टॉलची मुदत वाढविण्याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोषजिरगेयांना…

Read Full News

आजगाव भोम येथील कार्यकर्त्यांची जादू फळाला

भाजप सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळलासावंतवाडी – आजगाव भोम येथील कार्यकर्त्यांनी जादू करत भाजप सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर होण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला आली असून भाजप सरपांचावरील अविश्वास ठराव नामंजूर झाल्याने भाजप कार्यकर्ते किंगमेकर ठरले भोम येथे सेनेला धोबीपछाड करत भाजपने आपला गड राखला आहे.ग्रामपंचायत सरपंच अस्मिता यशवंत वेंगुर्लेकर यांच्यावरील अविश्वास ठराव विरोधात ग्रामसभेने मतदान करत नामंजूर…

Read Full News

ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडी तालुका शाखेची बैठक संपन्न

*💫सावंतवाडी दि.२३-:* ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडी तालुका शाखेची बैठक जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा संघटक .एकनाथ गावडे, तालुका संघटक .अनंत नाईक, सहसंघटक तुकाराम म्हापसेकर, महिला सहसंघटक सौ.परिनिती वर्तक, प्रसिद्धीप्रमुख रामचंद्र कुडाळकर आणि नवीन कार्यकर्ते प्रा.रुपेश पाटील उपस्थित होते. यावेळी कोरोना काळातील शाखेच्या कामाचा आढावा घेऊन पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले….

Read Full News

आमदार दीपक केसरकरांनि आता निवडणुकीसाठी गोव्यातील मतदारसंघ निवडावा

भाजपा चे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांचा आमदार दीपक केसरकरांना उपरोधिक टोला *💫सावंतवाडी दि.२३-:* भारतीय जनता पार्टीतर्फे सावंतवाडीत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा कार्यक्राम सुरू असून काल मालवण कणकवली येथे पार पडले. आज सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा येथे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे. जिल्हात १४ भाजप मंडळ असून हा कार्यक्रम पूर्ण जिल्हात पार पडणार…

Read Full News

आगामी नगरपालिका निवडणूक एकहाती जिंकण्यासाठी एकदिलाने काम करा

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आवाहन सावंतवाडी : आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत सतराही नगरसेवक हे भाजपाचे असले पाहिजे, यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन एकमेकांबद्दल असलेले गैरसमज दूर करून संघटना वाढीसाठी लक्ष द्या, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केले. सावंतवाडी शहर भाजप मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी येथील बॅ. नाथ पै सभागृहात कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा…

Read Full News

नांदगाव येथील अनाधिकृत स्टॉल, बांधकाम विभागाच्या जागेतील अतिक्रमण हटवा…

प्राताधिकारी वैशाली राजमाने यांचे बांधकाम उपभियंत्याना आदेश;रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी, रिक्षा व्यावसायिक यांनी घेतली भेट.. *💫कणकवली दि.२३-:* नांदगाव फाटा येथे १९८५ पासून असलेल्या रिक्षा स्टँडला रिक्षा अधिकृतपणे स्टँड असल्याने लावल्या जात आहेत. तेथील सुरेश मोरये विरोध करुन रिक्षाचालकांना त्रास देत आहेत. त्या रिक्षा स्टँडबाबत तातडीने निर्णय घ्यावा. नांदगाव तिठा येथे अनधिकृत स्टॉल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

Read Full News

नगराध्यक्षांनी पालिकेच्या रूग्णालयाला टाळे ठोकणे हे अयोग्यच

काँग्रेस उपतालुकाध्यक्ष समीर वंजाी यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया *💫सावंतवाडी दि.२३-:* नगरपालिकेच्या रूग्णालयाला नगराध्यक्ष संजू परब यांनी टाळे ठोकले. हे अयोग्य असून कायद्यामध्ये कुठेच नगराध्यक्षांना पालिका रूग्णालयास असा टाळे ठोकण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात काँग्रेस उप तालुका अध्यक्ष समीर वंजारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सावंतवाडी नगरपालिकेच्या पालिका रूग्णालयाला नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सकाळी टाळे…

Read Full News

अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या इंटरनॅशनल डायरेक्टर शोभा कोकीतकर यांचा सिंधुदुर्ग जील्याच्या वतीने करण्यात आले स्वागत…

अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या माध्यमांतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवा *💫सावंतवाडी दि.२३-:* एटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया हे देशातील सर्वात मोठे फाउंडेशन आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील अन्यायकारक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे फाउंडेशन काम करत आहे. या फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने योग्य काम करावे असे मत अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या इंटरनॅशनल डायरेक्टर…

Read Full News

जिल्ह्यात एकूण ४ हजार ८५० जण कोरोना मुक्त…

सक्रीय रुग्णांची संख्या१७५;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 850 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 2 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page