अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या माध्यमांतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवा
*💫सावंतवाडी दि.२३-:* एटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया हे देशातील सर्वात मोठे फाउंडेशन आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील अन्यायकारक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे फाउंडेशन काम करत आहे. या फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने योग्य काम करावे असे मत अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या इंटरनॅशनल डायरेक्टर शोभा कोकीतकर. यांनी सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अँटी करप्शन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना मत व्यक्त केले. यावेळी यांनी अँटी करप्शन फाउंडेशन भारत देशात कशाप्रकारे काम करते याविषयी चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे अँटिकरप्शन फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व गावातील पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम करून एक प्रशिक्षणात व समाजात स्थान निर्माण करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. या या कार्यक्रमवेळी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या इंटरनॅशनल डायरेक्टर शोभा कोकितकर, गोवा स्टेट प्रेसिडेंट सतीश नाइक. स्टेट व्हाईस प्रेसिडेंट नयनेश गावडे. डिस्ट्रिक्ट चेअरमन विकास तेंडोलकर गोवा डिस्ट्रिक्ट चेअरमन सुरेश खवणेकर. सावंतवाडी तालुका प्रेसिडेंट एकनाथ चव्हाण. चंदगड तालुका प्रेसिडेंट संजय गावडे. सावंतवाडी तालुका व्हाईस प्रेसिडेंट संतोष तळवणेकर.जिल्हा प्रेस प्रेसिडेंट रामचंद्र कुडाळकर. तालुका प्रेस प्रेसिडेंट शैलेश मयेकर. तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यात अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया च्या माध्यमांतून चागले काम करा असे यावेळी उपसथित मान्यवर यांनी मार्गदर्शन केले.