काँग्रेस उपतालुकाध्यक्ष समीर वंजाी यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
*💫सावंतवाडी दि.२३-:* नगरपालिकेच्या रूग्णालयाला नगराध्यक्ष संजू परब यांनी टाळे ठोकले. हे अयोग्य असून कायद्यामध्ये कुठेच नगराध्यक्षांना पालिका रूग्णालयास असा टाळे ठोकण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात काँग्रेस उप तालुका अध्यक्ष समीर वंजारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सावंतवाडी नगरपालिकेच्या पालिका रूग्णालयाला नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सकाळी टाळे ठोकले यावर वंजारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, कायद्यामध्ये कुठेच नगराध्यक्षांना टाळे ठोकण्याचा अधिकार नाही, ते प्रशासनाला नोटीस पाठवू शकतात किंवा फोन करून विचारू शकतात, मात्र असे पालिका रूग्णालयाला टाळे ठोकणे योग्य नाही. पालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांचा कोरोना महामारीत मोलाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. आज भाजपचा प्रशिक्षण दिन होता. त्यामुळे असे वागणे एका अध्यक्षांना न शोभणारे आहे. नगरराध्यक्षांकडून जनतेला वेगळी अपेक्षा आहे. मात्र अस वागण म्हणजे प्रशासनाचा अभ्यास नसणे यास दुजोरा मिळतो. त्यामुळे नगराध्यक्षांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे वंजारी यांनी सांगितले.