⚡देवगड ता.०४-: शिरगांव येथील आठवडा बाजाराच्या ठिकाणी शेठ .म. ग . हायस्कुल देवगडच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करत मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यात आली .या कार्यक्रमांना तहसिलदार देवगड रमेश पवार यांनी प्रोत्साहन देत विदयार्थ्यांचे कौंतुक केले .
या पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचा हक्क, त्याचे महत्त्व, निर्भय व निष्पक्ष मतदान तसेच मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. “माझे मत – माझा अधिकार” या संदेशातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पथनाट्यामुळे बाजारात उपस्थित नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले.
या कार्यक्रमात कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , महसुल सहाय्यक पूर्वाश्री आचरेकर , शिक्षक अरविंद धुर्वे , प्रदीप कदम आदी मान्यवर तसेच ग्रामपंचायत शिरगांव मार्फत अप्रतिम नियोजन करण्यात आले .
कार्यक्रमानंतर उपस्थित मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन प्रदीप कदम यांनी केले . तसेच शंभर टक्के मतदानासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पं .स. देवगड कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी केले .
या उपक्रमास बाजारातील व्यापारी, नागरिक तसेच मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या या प्रयत्नामुळे मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पंचायत समिती देवगडच्या तालुका समन्वयक सिमा बोडेकर तर आभार ग्रामपंचायत अधिकारी शिरगांव मंगेश साळसकर यांनी मानले .
शिरगांव आठवडा बाजारात प्रशासनामार्फत मतदान जनजागृती…
