⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील आडेली पंचायत समिती मतदार संघाचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नित्यानंद बाळकृष्ण शेणई यांनी आडेली गावात जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे. तसेच आडेली जि. प. चे उमेदवार विजय नाईक व वायंगणी पं. स. चे उमेदवार माडकर यांच्या प्रचारासही मोठा प्रतिसाद लाभत आहे. यावेळी आडेली खुटवळवाडी येथे उमेदवार नित्यानंद शेणई, आडेली माजी उपसरपंच व विभागप्रमुख घन:श्याम नाईक, मठ येथील सामाजिक कार्यकर्ते दयानंद शेणई, शेतकरी अशोक गडेकर, दत्ताराम कोकरे, वेतोरे शाखाप्रमुख सतीश वेतूरकर, मठ शाखाप्रमुख अरविंद बागायतकर, मठ माजी सोसायटी चेअरमन दिनेश गावडे, ओंकार नाईक, श्री. कांडरकर, विजय धुरी, मिलिंद धर्णे, राजन मठकर, रामदास आडेलकर, शेखर कांबळी, रवींद्र धर्णे, महेश सावंत, मठ बूथ कमिटी अध्यक्ष विनीत खानोलकर,श्री. तेंडोलकर, रघुवीर बोवलेकर आदी पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आडेली मतदारसंघाचा विकास घडविण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी प्रतिक्रिया नित्यानंद शेणई यांनी दिली. आडेली पं. स.मतदारसंघात ठाकरे सेनेच्या डोअर टू डोअर प्रचारामुळे निश्चितच परिवर्तन घडणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकारी यांनी दिली.आडेली, मठ, पालकरवाडी वेतोरे भागात ठाकरे शिवसेना पक्षाची प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यात आहे.
आडेली पंचायत समिती मतदारसंघात नित्यानंद शेणई यांचा घरोघरी प्रचार…
