नांदगाव येथील अनाधिकृत स्टॉल, बांधकाम विभागाच्या जागेतील अतिक्रमण हटवा…

प्राताधिकारी वैशाली राजमाने यांचे बांधकाम उपभियंत्याना आदेश;रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी, रिक्षा व्यावसायिक यांनी घेतली भेट..

*💫कणकवली दि.२३-:* नांदगाव फाटा येथे १९८५ पासून असलेल्या रिक्षा स्टँडला रिक्षा अधिकृतपणे स्टँड असल्याने लावल्या जात आहेत. तेथील सुरेश मोरये विरोध करुन रिक्षाचालकांना त्रास देत आहेत. त्या रिक्षा स्टँडबाबत तातडीने निर्णय घ्यावा. नांदगाव तिठा येथे अनधिकृत स्टॉल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे.ते तातडीने हटवा अशी मागणी सन्मित्र रिक्षा संघटना नांदगावच्यावतीने करण्यात आली.त्यावर कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी बांधकाम विभागाला अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत. तर कणकवली पोलिस निरीक्षकांना जागेवर जाऊन रिक्षा स्टँडचा वाद मिटवण्याचे सूचना केल्या आहेत. सन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव यांच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने व पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा ऑटो रिक्षा युनियन कार्याध्यक्ष अण्णा कोदे,भाजपा तालुका अध्यक्ष राजन चिके,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,असलदे सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर, ओटव सरपंच हेमंत परुळेकर ,आयनल सरपंच बापू फाटक, नांदगाव उपसरपंच निरज मोर्ये , कोळोशी सरपंच ऋतिका सावंत, माईन सरपंच श्री.सुघटनकर,सन्मित्र रिक्षा संघटना पंचकोशी अध्यक्ष विलास कांडर, महामुद काझी, दिलीप डामरे,इकबाल बटवाले, जाफर कुणकेरकर,देवु डामरे, सुरेश मोरजकर, संतोष पोकळे, अंकुश तेली,मंगेश परब, पंढरी म्हसकर,आप्पा गुरव, पांडू मयेकर, संतोष तांबे, ज्ञानेश्वर मर्ये, रहमान पाटणकर, तैय्यब नावलेकर, आप्पा गावकर,सुनील बोभाटे, मंदार गुरव आदी उपस्थित होते. तर कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेतल्यानंतर रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक यांनी स्वतः जाग्यावर येऊन हा स्टँडचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. कणकवली प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेल्या विषयांमध्ये सन्मित्र रिक्षा संघटना , नांदगाव आमच्या संघटनेमध्ये अधिकृत १ ९ ८५ पासुन आरटीओ जवळ नोंदणीकृत स्टॅन्ड आहे.या ठिकाणी श्री.सुरेश अर्जुन मोरये व त्यांची मुले आमच्या रिक्षा चालकांना दमदाटी करून रिक्षा लावण्यास मज्जाव करत आहे.त्याठिकाणी अधिकृत रिक्षा स्टॅन्डवर पुन्हा रिक्षा लावण्यासाठी सबंधित विभागाला निर्देश देवून आमची गैरसोय दूर करावी . नांदगाव तिठा येथ निपानी देवगड या राज्य महामार्गावर अनधिकृत बांधकाम श्री.सुरेश मोरये यांनी केले आहे.ते अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे.या ठिकाणी सार्वजनिक बांधकामाच्या जागेत अतिक्रमन केले आहे.ते तातडीने हटविण्यात यावे.तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या महामार्गावरील जागेतील अतिक्रमण हटवावे . नांदगाव तिठा येथे सार्वजनिक बोरवेल ग्रामपंचायत मालकीची आहे.त्या ठिकाणी हॉटेल अतिथीचे सांडपाणी सोडल्याने आरोग्याच्या दृष्टीने पाणी दुषित झाले आहे.या पूर्वी सबंधितांना ग्रामपंचायतने नोटीस बजावली आहे.तरीही श्री.सुरेश मोरये हे दाद देत नाही . तरी वरील मागण्यांचा विचार करुन येत्या ८ दिवसांत संबधितांवर कारवाई करुन सहाकार्य करावे , या मागण्या केल्या आहेत. कणकवली प्रांत अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्याशी या वरील विषयावर चर्चा झाली.मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शिष्टमंडळाने पुढील काळात हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page