आगामी नगरपालिका निवडणूक एकहाती जिंकण्यासाठी एकदिलाने काम करा

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आवाहन

सावंतवाडी : आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत सतराही नगरसेवक हे भाजपाचे असले पाहिजे, यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन एकमेकांबद्दल असलेले गैरसमज दूर करून संघटना वाढीसाठी लक्ष द्या, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केले. सावंतवाडी शहर भाजप मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी येथील बॅ. नाथ पै सभागृहात कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री तेली उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, सुधीर आरिवडेकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सकाळच्या सत्रात मार्गदर्शन करताना तेली म्हणाले, सावंतवाडी शहरामध्ये भाजपची संघटना वाढीसाठी प्रत्येक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी भाजपचे काम केंद्र शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचविल्या पाहिजे. स्थानिक आमदार कशाप्रकारे कुचकामी ठरले, त्यांनी केलेली भूमिपूजन व त्यानंतरची परिस्थिती नागरिकांना दाखवून दिली पाहिजे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खासदार विनायक राऊत कुडाळला नेण्याचे सांगतात तर पालकमंत्री वेत्ये येथे करणार असे सांगतात. मात्र प्रत्यक्षात काहीच हालचाली नाहीत. यासंदर्भात आवाज उठवणे गरजेचे आहे. वाढीव वीज बिले, शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे व नुकसान भरपाईबाबत पेटून उठणे गरजेचे आहे. आज भात शेती नुकसानीसाठी १४ कोटी२७ लाख रुपयांची मागणी होती. मात्र प्रत्यक्षात ३५ लाख प्राप्त झाले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजप पक्ष लक्षात घेता तो मजबूत होण्यासाठी विरोधक चुकीचे वागत आहे ते जनतेच्या नजरेत आणून देणे काळाची गरज आहे. ते पुढे म्हणाले, संघटना वाढीसाठी बुथ कमिटीवर लक्ष देणे गरजेचे आहे. आगामी पालिकेच्या निवडणुकीत १७ पैकी १७ नगरसेवक हे भाजपचे असले पाहिजेत, याकरिता सर्व नगरसेवकांनी व शहरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाबरोबरच ठाम राहताना योग्य बांधणी केली पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन एकमेकांबद्दल असलेले गैरसमज झटकून कामाला लागल्यास आपल्याला काहीच कठीण नाही. यावेळी मोठ्यया संख्येने शहरातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दुसºया सत्रामध्ये शैलेश दळवी, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदींनी मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page