भाजपा चे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांचा आमदार दीपक केसरकरांना उपरोधिक टोला
*💫सावंतवाडी दि.२३-:* भारतीय जनता पार्टीतर्फे सावंतवाडीत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा कार्यक्राम सुरू असून काल मालवण कणकवली येथे पार पडले. आज सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा येथे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे. जिल्हात १४ भाजप मंडळ असून हा कार्यक्रम पूर्ण जिल्हात पार पडणार आहे. प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून यासाठी आम्ही शिबीर कार्यक्रम देशभर राबवत आहोत, अशी माहिती भाजपचे नेता प्रमोद जठार यांनी सावंतवाडी पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली जठार म्हणाले, या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख १० मुद्दे आहेत. आत्म निर्भर तसेच पक्षाचे ध्येयधोरण तसेच पक्षाचे नियम आहे हे लोकांपर्यत पोहण्यासाठी हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रम माध्यमातून लकांना पर्यत पोहचणारआहे. प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून यासाठी आम्ही शिबीर कार्यक्रम देशभर राबवत आहोत. तसेच केसरकर यांच्या बदल मी काल व्हिडिओ पाहिली होती ते काल गोव्यात भाषण देत असल्या चा व्हिडिओ सोशल मिडीयावर आला होता.त्यांचे गोव्यावरील प्रेम खूप ओतू जातेय त्यामुळे त्यांनी गोव्यातील मतदार संघ निवडावा असा टोलाही त्यांनी केसरकरांना लगावाला