*💫सावंतवाडी दि.२३-:* ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडी तालुका शाखेची बैठक जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा संघटक .एकनाथ गावडे, तालुका संघटक .अनंत नाईक, सहसंघटक तुकाराम म्हापसेकर, महिला सहसंघटक सौ.परिनिती वर्तक, प्रसिद्धीप्रमुख रामचंद्र कुडाळकर आणि नवीन कार्यकर्ते प्रा.रुपेश पाटील उपस्थित होते. यावेळी कोरोना काळातील शाखेच्या कामाचा आढावा घेऊन पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तालुका कार्यकारिणी अपडेट करून भविष्यात चांगल्या प्रकारे काम करण्याचे सर्वानुमते ठरले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा, सावंतवाडी तालुका शाखेची बैठक संपन्न
