भाजप सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळलासावंतवाडी – आजगाव भोम येथील कार्यकर्त्यांनी जादू करत भाजप सरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर होण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला आली असून भाजप सरपांचावरील अविश्वास ठराव नामंजूर झाल्याने भाजप कार्यकर्ते किंगमेकर ठरले भोम येथे सेनेला धोबीपछाड करत भाजपने आपला गड राखला आहे.ग्रामपंचायत सरपंच अस्मिता यशवंत वेंगुर्लेकर यांच्यावरील अविश्वास ठराव विरोधात ग्रामसभेने मतदान करत नामंजूर केला.एकूण २६८ मतदारांनी मतदान केले, 6 जणांनी मतदान न करता माघारी गेले.८ मते ठरली बाद,तर अविश्वास ठरावाच्या बाजूने ११४ मते तर, ठरावाच्या विरोधात १३६ मतदान झाले.१८ मतांनी अविश्वास ठराव ग्रामसभेने नामंजूर करत सरपंच वेंगुर्लेकर यांचे सरपंच पद मतदारांनी अबाधित ठेवले आहे. सरपंच अस्मिता वेंगुर्लेकर यांनी हा विजय माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, भोम येथील भाजप कार्यकर्ते,तालुका पदाधिकारी, ग्रामस्थ,मतदार यांचा आहे असे स्पष्ट केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी काम पाहिले.
आजगाव भोम येथील कार्यकर्त्यांची जादू फळाला
