*💫सावंतवाडी दि.२३-:* दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा मंडई येथे स्टॉल लावण्यास दिलेली परवानगी संपल्याने आज पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व स्टॉल हटविले. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा वादंग निर्माण झाला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा मंडई येथे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्टॉल लावण्यास व्यापाऱ्यांना परवानगी दिली होती. मात्र ही मुदत आज संपल्याने व्यापाऱ्यांनी आज स्टॉलची मुदत वाढविण्याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोषजिरगेयांना निवेदन दिले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतेच उत्तर न आल्याने ठरल्याप्रमाणे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व स्टॉल हटविले. यावेळी सर्व स्टॉल धारकांनी तुम्हाला स्टॉल हटविण्याबाबत कोणी आदेश दिले किंवा कोणी पत्र दिले ते दाखवा, असे विचारले असता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही न सांगता मौन पाळले. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला. नगरपालिकेच्या या भूमिकेबद्दल व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
संत गाडगेबाबा मंडई येथील स्टाल हटावावरून पुन्हा वादंग व्यापाऱ्यांची नाराजी
