⚡वैभववाडी ता.२५-: वैभववाडी तालुक्यातील नावळे बिरदेवाडी येथे धनगर समाज भवन बांधकाम कामाचे भूमिपूजन विजय दशमीच्या मुहूर्तावर सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या आमदार निधीतून वैभववाडी तालुक्यातील नावळे जय मल्हार मित्र मंडळ नावळे बिरदेवाडी धनगरवाडा येथे धनगर समाज उभारणीसाठी दहा लाखाचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे जय मल्हार मित्र मंडळ नावे धनगरवाडा व धनगर समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या समाजभवनाचे भूमिपूजन सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते विजया दशमी दिवशी संपन्न झाले यावेळी उपसरपंच संजय रावराणे तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गुरव ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके गंगाराम गुरखे, जय मल्हार मित्र मंडळ मंडळाचे अध्यक्ष गणेश शेळके सचिव सोनू शेळके सल्लागार तथा माजी अध्यक्ष कृष्णा गुरखे संजय गुरखे ज्येष्ठ नागरिक रामचंद्र गुरखे ठेकेदार रामचंद्र बावदाने महेश रावराणे,रमेश शेळके,ग्राम विकास अधिकारी संभाजी वाघमोडे, सुरेश गुरखे पांडुरंग गुरखे अरुण गुरखे, चंदू गुरखे, सुभाष गुरखे, गंगाराम गुरखे, आकाश गुरखे आधी जय मल्हार मित्र मंडळाचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते सदस्य धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

