⚡सावंतवाडी ता.२५-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा मिलाग्रीस हायस्कूल , सावंतवाडी येथे बुधवार दि. २१ .१०.२०२६ रोजी संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . इब्राहिम शाह याने चौथा क्रमांक पटकावला आहे.

कु . इब्राहिम शहा जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु . इब्राहिम शहा याचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
