Headlines

मदर क्वीन इंग्लिश स्कूलमध्ये पाच दिवसीय फिटनेस योग शिबिराचा शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.१५-: मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे फिटनेस योग अकॅडमी , सिंधुदुर्ग यांच्या मार्फत बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता पाच दिवसीय फिटनेस योग शिबिराचे उदघाटन करण्यात आले . यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापक सौ अनुजा साळगावकर, फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक शेखर बांदेकर, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस योग अकॅडमीचे कोषाध्यक्ष रवींद्र…

Read Full News

आंबोली घाटातून येणाऱ्या मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करा…

सागर ढोकरे यांची मागणी: संबंधित पोलिसांनी त्वरित दखल घ्यावी.. ⚡सावंतवाडी ता.१५: मद्यधुंद अवस्थेत आंबोली घाटातून येणाऱ्या वाहन चालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका चिमुकलीचे निधन झाले असून घाटातून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करून नंतरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी केली आहे. काही दिवसांनी वर्षा…

Read Full News

रेडी गणपतीचा ५० वा वर्धापन दिन १८ एप्रिल रोजी…

⚡वेंगुर्ले ता.१५-: रेडी ( तालुका वेंगुर्ले) येथील प्रसिद्ध गणपतीचा ५० वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्यानिमित्ताने श्री सत्यविनायक महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी ६.०० वा. अभिषेक,सकाळी : ८.०० वा. श्री सत्यविनायक महापुजा ,दुपारी : १२.३० वा.महाआरती,दुपारी : १२.४५ वा. तिर्थप्रसाद. दुपारी : १.०० ते…

Read Full News

वेंगुर्ला शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

⚡वेंगुर्ला ता.१५-: “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” असा महामंत्र देऊन मरणासन्न समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने तालुका कार्यालयात तसेच शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . मंगळवारी 14 एप्रिल रोजी सकाळी 10…

Read Full News

मुणगेकर यांच्या निवासस्थानी ‘श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी’ सोहळ्याचे आयोजन…

⚡मालवण,ता.१४-:श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त १५ एप्रिल रोजी चेतन मुणगेकर यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध विधी आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुणगेकर परिवाराकडून करण्यात आले आहे. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सकाळी ६.३०…

Read Full News

कुंभारमाठ येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण, ता.१४-:कुंभारमाठ येथे श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भव्य ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आणि विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा १५ एप्रिल रोजी संपन्न होणार असून कुंभार समाज कुंभारमाठ यांच्या वतीने सर्व भाविकांना दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात सकाळी लवकर…

Read Full News

मालवणच्या अपर्णा मोर्जे हिचे जीपॅट परीक्षेत सुयश…

⚡मालवण ता.१४-:एम. फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जीपॅट २०२६ परीक्षेत यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी आणि मालवण दांडी येथील सुकन्या अपर्णा सत्यवान मोर्जे हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट २०२६ परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे जीपॅट ही एम फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा…

Read Full News

मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे उद्या वेंगुर्ला दौऱ्यावर…

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमधील वेंगुर्ला भटवाडी येथे “नमो उद्यान विकसित करणे” या कामाचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 वाजतासंपन्न होणार आहे. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना मधून…

Read Full News

वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी सुमन कामत यांची निवड…

⚡वेंगुर्ला ता.१४-: ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी वायंगणी माजी सरपंच सुमन हरिश्चंद्र कामत यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. माजी खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्याशी विचारविनिमय करून तालुकाप्रमुख निलेश चमणकर यांनी ही निवड करण्यात…

Read Full News

वेंगुर्ला पोलिसांची धडक कारवाई ; कॅम्प येथे 13 हजार 750 रुपयांचा गुटखा जप्त…

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला पोलिसांनी आज मंगळवारी सकाळी 11.30 वा. वेंगुर्ला तहसील ऑफिस समोरील म्हाडा कॉलनीकडील कच्च्या रोडवर जात असताना अनिता अजित गावडे (45,रा. म्हाडा कॉलनी, कॅम्प वेंगुर्ला ) यांच्या ताब्यातील अवैध 13 हजार 750 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये तंबाखू विमल पान मसाला आदी दोन प्रकारच्या गुटखाचा समावेश आहे. याबाबत संशयित महिलेविरोधात वेंगुर्ला…

Read Full News

You cannot copy content of this page