⚡मालवण ता.१४-:
एम. फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जीपॅट २०२६ परीक्षेत यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी आणि मालवण दांडी येथील सुकन्या अपर्णा सत्यवान मोर्जे हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे.
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट २०२६ परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे जीपॅट ही एम फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा असून या परीक्षेत औषध निर्माण शास्त्र क्षेत्रातील उच्च शिक्षण, संशोधन आणि करियरच्या विविध संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतात. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात मालवण दांडी येथील अपर्णा सत्यवान मोर्जे हिने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या विद्यार्थिनीला प्रा. रोहन बारसे, प्रा. डॉ. तुषार तूकारी, प्रा. डॉ. विनोद मुळे, प्रा. गायत्री आठलेकर, प्रा. गौरी भीवशेत यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, समन्वयक सुनेत्रा फाटक, सी. इ. ओ. ले. कर्नल. रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ. विजय जगताप, अस्पायर क्लबचे समन्वयक प्रा. प्रणिता पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अपर्णा मोर्जे ही शिवसेना मच्छिमार आघाडी मालवण तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ भाऊ मोर्जे यांची पुतणी आहे. तीच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
