⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमधील वेंगुर्ला भटवाडी येथे “नमो उद्यान विकसित करणे” या कामाचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता
संपन्न होणार आहे. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना मधून या विकासकामासाठी निधी मंजूर झाला आहे. नगरसेवक, नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.
मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे उद्या वेंगुर्ला दौऱ्यावर…
