वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी सुमन कामत यांची निवड…

⚡वेंगुर्ला ता.१४-: ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी वायंगणी माजी सरपंच सुमन हरिश्चंद्र कामत यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. माजी खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्याशी विचारविनिमय करून तालुकाप्रमुख निलेश चमणकर यांनी ही निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेत त्यांचे सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे जनशताब्दी वर्षानिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, याबाबतचे नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख निलेश चमणकर, उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे, उभादांडा विभागप्रमुख सुजित चमणकर, उपविभागप्रमुख अभिमन्यू भुते, श्री. मांजरेकर, दिलीप राणे, श्री. मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page