⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला पोलिसांनी आज मंगळवारी सकाळी 11.30 वा. वेंगुर्ला तहसील ऑफिस समोरील म्हाडा कॉलनीकडील कच्च्या रोडवर जात असताना अनिता अजित गावडे (45,रा. म्हाडा कॉलनी, कॅम्प वेंगुर्ला ) यांच्या ताब्यातील अवैध 13 हजार 750 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये तंबाखू विमल पान मसाला आदी दोन प्रकारच्या गुटखाचा समावेश आहे. याबाबत संशयित महिलेविरोधात वेंगुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस हवालदार योगेश राऊळ, मनोज परुळेकर, जयेश सरमळकर,महिला पोलीस कॉस्टेबल गौरवि ताम्हणेकर आदी पोलीस पथकाने केली. याप्रकरणी अधिक तपास वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगवान चव्हाण हे करीत आहेत. वेंगुर्ला पोलिसांच्या धडक कारवाईमुळे शहरातील गुटखा विक्री व्यावसायिक यांचे धाबे दणाणले आहेत.
वेंगुर्ला पोलिसांची धडक कारवाई ; कॅम्प येथे 13 हजार 750 रुपयांचा गुटखा जप्त…
