⚡वेंगुर्ले ता.१५-: रेडी ( तालुका वेंगुर्ले) येथील प्रसिद्ध गणपतीचा ५० वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्यानिमित्ताने श्री सत्यविनायक महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी ६.०० वा. अभिषेक,सकाळी : ८.०० वा. श्री सत्यविनायक महापुजा ,दुपारी : १२.३० वा.महाआरती,दुपारी : १२.४५ वा. तिर्थप्रसाद. दुपारी : १.०० ते ५.०० वा. पर्यत महाप्रसाद, सायं ३.०० ते ८:०० वा. स्थानिक भजने, सायंकाळी ५.०० वाजता श्री गणेश माऊली संगीत ग्रुप प्रस्तुत “स्वर गणेश” तसेच ,रात्री ८.३० वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक.
तरी या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून तिर्थप्रसाद, महाप्रसादाचा ,नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी व ग्रामस्थांनी केले आहे.
रेडी गणपतीचा ५० वा वर्धापन दिन १८ एप्रिल रोजी…
