⚡वेंगुर्ला ता.१५-: “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” असा महामंत्र देऊन मरणासन्न समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने तालुका कार्यालयात तसेच शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . मंगळवारी 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता वेंगुर्ला भाजप मार्फत भाजप कार्यालय वेंगुर्ला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा प्रभुखानोलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत तसेच भारताच्या संविधनाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच वेंगुर्ला शहरातील आनंदवाडीतील समाज मंदिरात जाऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, मच्छीमार जिल्हा संयोजक तथा तालुका सरचिटणीस वसंत तांडेल,तालुका सरचिटणीस राजबा सावंत, नगरसेविका गौरी माईणकर, काजल कुबल, सचिन शेट्ये, सदानंद गिरप, दाजी परब,
युवराज जाधव ,
पंचायत समिती सदस्य संकेत धुरी ,वामन जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, तालुका संघटक बाळा दळवी, उभादांडा पं. स. सदस्य साक्षी नार्वेकर, युवासेनेचे पंकज शिरसाट, सत्यवान साटेलकर, शैलेश नार्वेकर, शामसुंदर कोळंबकर, जयवंत मालणकर आदी उपस्थित होते.वेंगुर्ला राऊळवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, ज्येष्ठ नेते जी.जी.टाककर, जिल्हा सचिव सुशील चमणकरआणि तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर, ॲड. मनीष सातार्डेकर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच देशाला प्रगतीची दिशा मिळाली असून त्यांचे विचार घराघरात पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल , असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये तालुका सचिव सचिन कोंडये,उभादांडा माजी उपसरपंच गणपत केळुसकर , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मोटे, धैर्यशील टाककर,युवा तालुकाध्यक्ष गजानन कुंभार, श्याम नवार, ओबीसी सेल उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच वेंगुर्ला नगरपरिषद येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
वेंगुर्ला शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…
