⚡सावंतवाडी ता.१५-: मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे फिटनेस योग अकॅडमी , सिंधुदुर्ग यांच्या मार्फत बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता पाच दिवसीय फिटनेस योग शिबिराचे उदघाटन करण्यात आले .
यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापक सौ अनुजा साळगावकर, फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक शेखर बांदेकर, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस योग अकॅडमीचे कोषाध्यक्ष रवींद्र प्रभू देसाई, कक्षा प्रमुख रामनाथ सावंत, सह कक्षा प्रमुख महादेव सावंत, नारायण सावंत, यशवंत आरोसकर, काशिनाथ पेडणेकर, योगिता आरोसकर, निशिगंधा सावंत, चेतना शिंदे, रुपाली पेडणेकर , तृप्ती मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर योगशिक्षक शेखर बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. सूर्यनमस्कार, योगासने, सुक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला तसेच मुलांचा कठीण आसनांचा सराव देखील घेण्यात आला. योगाभ्यासासोबत हेल्दी फूड चे महत्व देखील मुलांना सांगण्यात आले. नियमितपणे योगाभ्यास केल्याने आपण रोगमुक्त होतो त्यामुळे प्रत्येकाने योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असे स्कूलच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले.
