देवगडप्रमाणे वेंगुर्ला शहराचा पर्यटन विकास करावयाचा आहे…

ना. नितेश राणे ;दिलीप गिरप यांनी
शहर विकासासाठी आणखी संकल्पना राबवाव्यात..

⚡वेंगुर्ला ता.१५-: ज्या प्रमाणे देवगडचा पर्यटन विकास केला आहे त्याचप्रमाणेच वेंगुर्ला शहरात नमो गार्डन प्रकल्पामुळे शहराचा व ग्रामीण भागाचा निश्चितच अधिकचा विकास होऊन निश्चितच पर्यटनात वाढ होईल. त्यासाठी दर्जेदार गार्डन साकारून शासनाचे 5 कोटीचे बक्षीस मिळविण्यास पात्र व्हा, असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी वेंगुर्ला भटवाडी येथे (15 एप्रिल )बोलताना केले.
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमधील वेंगुर्ला भटवाडी येथे शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना मधून मंजूर झालेल्या
“नमो उद्यान विकसित करणे” या विकासकामाचा भूमिपूजन शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते दुपारी संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ना. नितेश राणे बोलत होते. यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नायब तहसीलदार राजन गवस,जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवत, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, न. प.बांधकाम सभापती प्रणव वायंगणकर, नगरसेवक प्रीतम सावंत, प्रशांत आपटे, युवराज जाधव, सचिन शेट्ये, संदेश निकम, रवी शिरसाट, सदानंद गिरप, विनय नेरुरकर, सुधीर पालयेकर, दाजी परब, नगरसेविका आकांक्षा परब, गौरी मराठे, रिया केरकर, सुषमा प्रभूखानोलकर, काजल कुबल, सुमन निकम, शीतल आंगचेकर, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, गौरी माईणकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, भाजपचे कमलेश गावडे, स्थानिक नागरिक, न. प. अधिकारी, कर्मचारी आदिसह भटवाडी कार्यक्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी ना. नितेश राणे यांचे स्वागत केले.सुहास गवंडळकर, गौरी मराठे व स्थानिक नागरिकांच्या वतीने ना. नितेश राणे यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.

You cannot copy content of this page