⚡बांदा ता.१३-: दरवर्षीप्रमाणे यंदाही बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक भाऊ वळंजू आणि शशिकांत पित्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर, शंकर नार्वेकर, सौ अर्चना सावंत, मिलिंद महाजन, ग्रंथपाल सुस्मिता नाईक आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत एस. आर. सावंत यांनी केले. उद्योजक भाऊ वळंजू आणि शशिकांत पित्रे यांच्या देणगीतून वाचकांसाठी दरवर्षी दिवाळी अंक योजना साकारली जाते. सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले. १०० रुपये वर्गणीतून वर्षभर दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध होणार आहे.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ करताना मान्यवर.

