Headlines

कारची डंपरला धडक बसून गुजरातमधील तिघे जखमी

कुडाळ गुढीपुर येथे अपघात कुडाळ– गोव्याहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गुजरात येथील पर्यटकांच्या कार गाडीची जोरदार धडक महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसून झालेल्या अपघातात कार मधील तिघे जण जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर चा अपघात गुढीपूर येथील महामार्गावर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत सविस्तर वृत्त…

Read More

किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मालवण (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणच्या समुद्रात उभारलेल्या किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापन दिन आज किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे साजरा करण्यात आला. यानिमित्त मोरयाचा धोंडा येथे गणेश पूजन व किल्ले सिंधुदुर्गात शिवराजेश्वर मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली. किल्ले सिंधुदुर्गच्या वर्धापन दिनानिमित्त किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे आज सकाळी ८ वाजता मोरयाचा धोंडा येथे प्रा. डॉ. रामचंद्र काटकर यांच्या…

Read More

शिष्यवृत्ती प्राप्त दांडी शाळेची विद्यार्थीनी कु.विधिशा कुबल हीचा विशेष गौरव

मालवण ता.१६-:* जि.प.पूर्ण प्राथ.मालवण दांडी शाळेची विद्यार्थीनी कु.विधिशा रामचंद्र कुबल हीने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ मालवण मार्फत गौरवचिन्ह, सन्मानपत्र देऊन मालवण गटशिक्षणाधिकारी श्री.संजय माने यांच्या शुभहस्ते तिला गौरवण्यात आले. यावेळी पालक सौ.सरोज संदीप लोणे, मार्गदर्शक शिक्षिका सौ.मनिषा ठाकुर ,मार्गदर्शक शिक्षक श्री.रामदास तांबे , केंद्रप्रमुख श्री.अन्वर शेख ,…

Read More

कंत्राटी विज कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईस विलंब का?

कंत्राटी विज कर्मचाऱ्यांचा पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब मालवण दि प्रतिनिधी आचरे येथील विजवीतरणाचे कंत्राटी वीज कर्मचारी आनंद मिराशी याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी तक्रार आचरे पोलीस ठाण्यात नोंदवून आठवडा उलटला तरी कारवाई न झाल्याने संतप्त बनलेल्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी मयत आनंद मिराशी याच्या कुटुंबासमवेत कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक…

Read More

तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ…

सहा दुकाने, दोन घरे, एक बियर शॉप फोडली… वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यात शहरा‌सह ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.शनिवारी पहाटे शहरातील दोन घरे, व पाच दुकाने तर करुळ जामदारवाडी येथील एक दुकान व बियर शाॕपी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे.वैभववाडी शहरातील अशोक शंकर कुबडे यांच्या बंद घरातील २ लाख २४ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या तर करुळ येथील…

Read More

कोल्हापुरातील जयश्री जाधव यांच्या विजयाने वैभववाडीत काँग्रेसचा जल्लोष…

वैभववाडी ता.१६-:* कोल्हापूर येथे काॕग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्यानंतर वैभववाडी तालुका काॕग्रेसच्यावतीने वैभववाडी येथील संभाजी चौकात फटाक्यांची अतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. यावेळी युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, महिला अध्यक्षा मिनाताई बोडके, वसंत नाटेकर, बाळा पांचाळ, भारती कुडतडकर, दिलीप रावराणे , सिध्दार्थ कांबळे, मंगेश कोलते, सदानंद वाडेकर, रमेश सोनार आदी उपस्थित होते.

Read More

हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा

जल्लोष २०२२ धमाकेदार कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली ता.१६-:*शकणकवली शहरातील कांबळे गल्ली येथील बाळ गोपाळ हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.या उत्सवानिमित्त सकाळपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच मंदिर परिसरात मंडप,मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिर परिसरात रांगोळी घालून आकर्षक…

Read More

सावंतवाडीत हनुमान जयंती उत्साहात साजरी

सावंतवाडी ता.१६-:शहरातील हनुमान मंदिरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी शहरातील सर्वच हनुमान मंदीरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी शहरातील प्रसिद्ध असलेल्या नरेंद्र डोंगर येथील हनुमान मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती

Read More

फोंडाघाट महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

कणकवली ता.१६-:* कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्ताने महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी विषयक विचार या विषयावर निबंध स्पर्धा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक सामाजिक चळवळ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.      या कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संतोष रायबोले यांनी महात्मा फुले,…

Read More

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ मालवणच्या ‘अखिल्स हेल्प डेस्क’चे उद्घाटन

मालवण ता.१६-:* दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाला सर्व शिक्षकांना समर्थपणे तोंड देता यावे यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शाखा मालवण या संघटनेने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. संघटनेतील तंत्रस्नेही शिक्षक राजेश भिरवंडेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या व अमर वाघमारे आणि परशुराम गुरव यांच्या नेतृत्वाखाली ‘अखिल्स हेल्प डेस्कची’ निर्मिती करण्यात आली असून त्याची सुरुवात…

Read More
You cannot copy content of this page