सहा दुकाने, दोन घरे, एक बियर शॉप फोडली…
वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.शनिवारी पहाटे शहरातील दोन घरे, व पाच दुकाने तर करुळ जामदारवाडी येथील एक दुकान व बियर शाॕपी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे.वैभववाडी शहरातील अशोक शंकर कुबडे यांच्या बंद घरातील २ लाख २४ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या तर करुळ येथील विजय गणपत पाटील यांच्या दुकानातील रोख २४ हजार रुपये रोख दुकान फोडून लंपास केले आहेत.त्याचप्रमाणे वैभववाडी शहरातून एक तर खांबाळे येथून एक अशा दोन मोटारसायकलही चोरीस गेल्या आहेत.माञ याची पोलिसात तक्रार देण्यात आलेले नाही.या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.वैभववाडी पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे.
याबाबत करुळ येथील विजय पाटील यांनी वैभववाडी पोलिसात तक्रार दिली आहे.करुळ जामदारवाडी येथे घराच्या पुढच्या भागात किराणा मालाचे दुकान आहे.शुक्रवारी राञी ९.३० वा.सुमारास दुकान बंद करुन जेवन करुन राञी ११.४५ च्या सुमारास झोपले.सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघड्यासाठी ते आले असता, त्यांना दुकानाचे शटर तोडून उघडलेले दिसले.त्यांनी दुकानात येऊन पहाणी केली.तर ड्राॕव्हरमध्ये व्यापाऱ्याला देण्यासाठी ठेवलेले २४ हजार रुपये चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी याबाबत वैभववाडी पोलिस ठाणेत तक्रार दिली आहे.
तर वैभववाडी शहरातील अशोक शंकर कुबडे हे घर बंद करुन कुटुंबासह बाहेर गेले होते.शनिवारी सकाळी त्यांचे भाऊ बाळकृष्ण कुबडे यांना अशोक यांच्या घराचा दरवाजा तोडलेला दिसला.त्यांनी याबाबत त्यांना माहीती दिली.त्यांनी घरात येऊन पहाणी केली.तर कपाटातील सुमारे २ लाख १८ हजार २२ रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे निदर्शनास आले.या दोघांनीही वैभववाडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे शहरातील संतोष कोलते स्वरगंगा इलेक्ट्रिक दुकान, शशिकांत गोखले यांचे गोखले हाॕटेल, वैभव पोरे यांचे भांड्याचे दुकान, नितिराज कदम यांचे स्टेशनरी दुकान, तसेच कुडाळकर यांचे रुपाली ज्वेलर्स ही दुकाने फोडण्यात आली. या दुकानातून रोख रक्कम नव्हती.त्यामुळे दुकानातील सामान विस्कटून टाकले.रुपाली ज्वेलर्समध्ये चांदीचे दागीने होते.माञ त्याला चोरट्यांनी हात लावलेला नाही.झालेल्या चोरीवरुन त्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागीण्यांवर डल्ला मारला आहे.तर वैभववाडी तहसिलदारांचे निवास स्थान असलेला सरकारी बंगलाही फोडला आहे.माञ यातून काही चोरीस गेल्याची नोंद उशीरापर्यंत करण्यात आलेली नाही.तसेच करुळ येथील शरद सावंत यांची बिअर शाॕपीही चोरट्यांनी फोडली आहे.माञ याचीही नोंद पोलिस ठाणेत करण्यात आलेली नाही.
सकाळी माहीती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अतुल जाधव, पोलिस मारुती साखरे, अभिजीत तावडे, नितीन खाडे, संदीप राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या चोरट्यांचा छडा लावण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचरण करण्यात आले होते.चोरी झालेल्या ठिकाणाचे ठसे घेण्यात आले आहेत.तर श्वान पथकाकडून माग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वैभववाडी शहरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता, फुटेजमध्ये चार अज्ञात चोरटे कैद झाले आहेत.
माञ चेहऱ्यावर फडका बांधल्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नाही.राञी ४ वा.सुमारास शहरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या संशयीत व्यक्ती दिसत आहेत.यावरुन पोलिस तपास सुरु आहे.तर स्वरगंगा इलेक्ट्रिक दुकानातील सीसीटीव्ही कॕमेरातही चोरटे कैद झाले आहेत. चौकट- वैभववाडी शहरातील सुभाष सावंत व खांबाळे येथील संजय पुंडलिक साळुंखे या दोघांच्या मोटारसायकलही याच राञी चोरीस गेल्या आहेत.माञ सायंकाळी उशीरापर्यंत याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आलेली नव्हती.
एकाचवेळी नऊ ठिकाणी चोरी तसेच दोन मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्यामुळे वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.या चोरीचा छडा लावणे हे पोलिसासमोर आव्हान आहे.शहरातील राञीच्यावेळी असलेली पोलिसांची गस्ती वाढविण्यात यावी.अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे. फोटो 1 वैभववाडी शहरातील चोरी झालेल्या दुकानाचा पंचनामा करताना पोलिस निरीक्षक अतुल जाधव,व पोलिस कर्मचारी 2 चोरटेने फोडलेले दुकान दिसत आहे. छाया संजय शेळके वैभववाडी
