कंत्राटी विज कर्मचाऱ्यांचा पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब
मालवण दि प्रतिनिधी आचरे येथील विजवीतरणाचे कंत्राटी वीज कर्मचारी आनंद मिराशी याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी तक्रार आचरे पोलीस ठाण्यात नोंदवून आठवडा उलटला तरी कारवाई न झाल्याने संतप्त बनलेल्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी मयत आनंद मिराशी याच्या कुटुंबासमवेत कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली आचरा पोलीस ठाण्याला धडक देत पोलीस अधिकाऱ्यांना घेराव घालीत जाब विचारला. यावेळी श्री. सावंत यांनी आनंद याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईस विलंब का ? असा सवाल करून याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर भा.द.वी ३०२ अन्वये गुन्हा दाखल न झाल्यास जिल्ह्यातील पाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन आंदोलन छेडण्याचा रोखठोक इशाराही श्री. सावंत यांनी दिला आहे. दरम्यान, आचरा पोलिसांकडे सर्व पुरावे देऊनही अधिकाऱ्यांवर पोलीस कारवाई का करीत नाही. आम्ही न्याय तरी कुणाकडे मागायचा आम्ही आमचा मुलगा गमावला आहे त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांना शिक्षा घडवा अशी मागणी मयत आनंद मिराशीच्या नातेवाईकांनी केले आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच शनिवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास येथील वीज मंडळ अधिकाऱ्याने कंत्राटी कामगार आनंद मिराशी याला कॉल करत बोलावून घेत विद्युत पोलवर चढविण्यात आले होते दुरुस्तीचे काम सुरू असताना आनंद याला शॉक लागून तो गंभीर जखमी झाला होता.त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला होता या प्रकारानंतर संघटनेचे नेते अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना घेराव घालत आनंद मिराशी याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यात्या सहाय्यक अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच मिराशी कुटुंबियांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती तर आचरे पोलीस ठाण्यातही याबाबत तक्रार मिराशी कुटूंबियांनी देऊनही पोलिसांकडून त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्याने अशोक सावंत यांनी आज मयत आनंद मिराशी याचे नातेवाईक विजया तोरणकर, प्रज्ञा सावंत, बाबुराव मिराशी, सुभाष मिराशी तसेच आचरे गावचे माजी सरपंच राजन गावकर, कंत्राटी कामगार संघटना अध्यक्ष आनंद लाड, कंत्राटी कामगार विठ्ठल साळकर, शुभम मुणगेकर, संदीप पांगम, महेश राऊळ, सागर गावडे, संजय गोवेकर यांच्या समवेत पोलीस स्टेशनला दाखल झाले यावेळी उपस्थितांनी या प्रकरणाला सात दिवस उलटूनही कारवाई का होत नाही असा सवाल पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांना करत योग्य पंचयादी करण्याची मागणी केली त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका त्याच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली
यावेळी अशोक सावंत म्हणाले की वीज वितरणाच्या अभियंत्यांनी आनंद मिराशी याला मोबाईल कॉल करत बोलावून घेत कंत्राटी कामगाराला विद्युत पोलवर चढण्याची परवानगी नसताना देखील ११ केव्हीच्या लाईनच्या पोलवर त्याला चढवले त्यात अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला मुख्य वायरमनही जागेवर नव्हता तोही तेवढाच जबाबदार असून त्यालाही आरोपी बनवावे. वीज वितरणने कुटूंबियांना तात्काळ मदत देण्याचे मान्य करूनही कोणतीही मदत मिळालेली नाही. आज गुन्हा दाखल करण्याची विनंती करायला आलोय मात्र गुन्हा दाखल न झाल्यास जिल्ह्यातील पाचशेकंत्राटी कामगारांसह आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आचरा पोलीसांना दिला आहे.
मयत आनंदच्या नातेवाईकांनी आनंद याला सकाळी त्या अधिकाऱ्याने बोलावले याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याला त्याच अधिकाऱ्याने बोलावले तो राहत असलेल्या इमारतीची लाईट गेली होती आनंदची त्या भागात ड्युटी नसताना त्याला अधिकारी याने बोलावून घेतले आंनद घरातून तोंड न धुताच घरातून गेला होता त्याचे फोन रेकॉर्ड, व रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असे असताना पोलीस कारवाईस वेळ का काढत आहेत असा सवाल त्यांनी विचारला आहे. अपघात घडल्यानंतर आम्हाला कोणतीही कल्पना न देता आनंद याला परस्पर घेऊन गेलेत. त्याच्याकडे असलेला मोबाईल कुठे असे आम्ही वारंवार विचारत होतो मात्र कोणीही त्यातील उत्तर देत नव्हते त्याचा मोबाईल चार दिवस गायब करण्यात आला होता.
पंचनाम्यावेळी आम्ही पोलीसांना मोबाईल विचारला तो कोणी काढून घेतला हे पहिले तपासा असे सांगितल्यानंतर एका तिसऱ्या व्यक्तीनेच मोबाईल आणून दिला मोबाईल लॉक असल्याने आतील माहिती त्याना डिलीट करता आली नाही अन्यथा तीही डिलिट करत रेकॉर्डिंग चे पुरावे नष्ट केले असते असा आरोपही नातेवाईकांनी यावेळी केला घरात लहान भावंडे आहेत, आजोबा आजारी आहेत तो मुलगा कुटुंबाचा गाडा चालवत होता. कुटुंबाने आता कोणाच्या तोंडाकडे बघायचे त्याचा घात झाला आहे त्याला निदान मृत्यूनंतर तरी न्याय मिळवुन द्यावा अशी आर्त मागणी मिराशी कुटुंबातील नातेवाईकांनी केली आहे फोटो वीज वितरणाचा कंत
