Headlines

नांदोस ग्रामविकास संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात…

⚡मालवण ता.१६-:
मालवण तालुक्यातील नांदोस गावातील विद्यार्थ्यांनी दहावी-बारावी व पदवीधर परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यांचे हे यश व सातत्याने सुरू राहिलेली यशाची परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन करावे व नांदोस गावातील विद्यार्थ्यांनी उच्चमस्तर पदावर पोहोचावे. त्यासाठी नांदोस ग्रामविकास संस्था विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य करेल असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष राजाराम उर्फ दादा गावडे यांनी श्री देव गिरोबा मंदिर नांदोस येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले

नांदोस ग्रामविकास संस्थेमार्फत अंगणवाडी पासून पदवीधर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात संस्थेचे सचिव सुधीर ज.पार्टे व सौ.सीमा सुधीर पार्टे या दांपत्याकडून उपस्थित मान्यवर व शिक्षक यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी शर्मिला मेहता (मुंबई) व सौ.सीमा सुधीर पार्टे व गावातील दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट (MITM) चे प्राध्यापक श्री.अनिरुद्ध झाट्ये, प्राध्यापिका लक्ष्मी सावंत मॅडम तसेच वराडकर हायस्कूल कट्टा कलाशिक्षक श्री.समीर चांदरकर सर यांनी विद्यार्थी व पालकवर्ग यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी (MITM) प्राध्यापक प्रणव सावंत, तेजस नाईक, श्रीधर पवार, अश्विता जाधव, श्वेता सुतार सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
संस्था पदाधिकारी राजाराम भि.गावडे, सुधीर ज.पार्टे, जयसिंग पार्टे, संभाजी(भाऊ) गावडे, दिलीप नलावडे, महेंद्र शृंगारे, रमेश नांदोसकर, भिकाजी(बाळा) गावडे, हेमंत माळकर, चंद्रकांत गावडे, राजू हरी गावडे, अनिल पार्टे, शैलेश बिबवणेकर व नांदोस ग्रामविकास संस्थेचे सर्व सभासद/हितचिंतक तसेच शिक्षक वर्गातून तानाजी गावडे सर, चंद्रसेन पाताडे सर, कुबल मॅडम व अंगणवाडी सेविका/मदतनीस सौ.धनश्री गावडे, सौ.वैशाली पार्टे, सौ.भाग्यश्री माळकर, सौ.सान्वी चव्हाण व सर्व कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, पालक, नांदोस ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हेमंत माळकर यांनी मानले.

You cannot copy content of this page