शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांचा मार्ग मोकळा:जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची सहकार्याची ग्वाही..
⚡मालवण ता.१६-:
मठबुद्रुक सारख्या ग्रामीण भागात सातत्याने चांगले काम करणाऱ्या या संस्थेचे मनापासून अभिनंदन करत आहे तसेच नूतन इमारत बांधकामासाठी बँकेच्या वतीने आणि वैयक्तिक पातळीवर सर्व प्रकारचे सहकार्य सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि जनतेसाठी अत्यंत मोलाचे व कौतुकास्पद काम करणाऱ्या मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मठबुद्रुक या संस्थेच्या नूतन इमारत भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते हा दिमाखदार भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.
या सोहळ्याला जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक व्हिक्टर डान्टस, समिर सावंत, संदीप परब, कमलाकांत कुबल, सुनिल मरळकर, सीमा परुळेकर, सोनाली घाडीगावकर, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला परिसरातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी उपस्थित राहून संस्थेला शुभेच्छा दिल्या. यामध्ये बुधवळे सरपंच संतोष पानवलकर, मठबुद्रुक सरपंच मोहन वेंगुर्लेकर, निरोम सरपंच बाबाजी (राजू) राऊत, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, तसेच गोठणे विकास संस्थेचे अध्यक्ष घनश्याम चव्हाण, किर्लोस विकास संस्थेचे अध्यक्ष स्वानंद भावे, असरोंडी विकास संस्थेचे अध्यक्ष दिलिप घाडीगावकर आदी उपस्थित होते.
मठबुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन व अध्यक्ष जनार्दन रामचंद्र घाडीगावकर, दिपक सोनु सावंतआणि अशोक शशिकांत कांदळकर यांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. याशिवाय गावातील गुरुदेव केळुसकर, जनार्दन सावंत, मारुती घाडीगावकर, निलेश बाईत, संतोष बाईत, श्रीराम पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सतिश ऊर्फ राजू परुळेकर, उपाध्यक्ष भानुदास येरम यांच्यासह संचालक मंडळ जनार्दन सावंत, अशोक कांदळकर, भानुदास गायकवाड, उमाजी मालप, बाबुराव जंगले, विठोबा बागवे, कृष्णा घाडी, श्रीमती सुनिता बागवे, श्रीमती सावित्री कांदळकर, सुभाष मांजरेकर, महादेव पाताडे, सोनु जंगले, कमलेश घाडीगावकर यांनी अथक परिश्रम घेतले.
नूतन इमारतीच्या उभारणीमुळे मठबुद्रुक आणि परिसरातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
